न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. २५ डिसेंबर) रोजी १११ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील तीन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले तीन पुरुष रुग्ण हे बिजलीनगर ६१ वर्षे, काळेवाडी ६५ वर्षे, दिघी ४८ वर्षे येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९५९६१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२५१२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७४५ जणांचा मृत्यू झालेला आहे.