न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील चार निरीक्षकांना पोलीस उपअधीक्षक / सहायक आयुक्तपदी बढती मिळाली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस कल्याण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेकलावंड यांना पदोन्नतीने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
वरिष्ठ निरीक्षक राजकुमार शिंदे यांना धुळे येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे पोलीस उपअधीक्षक म्हणून पदोन्नतीने नियुक्त करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक खंडेराव खैरे तसेच वरिष्ठ निरीक्षक प्रकाश यांचीही पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभाग (गुन्हे) येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली.


















