- गुटखा बनवण्याच्या मशीनसह आरोपी जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०२०) :- घरातच गुटखा बनविण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी गुटखा बनवण्याची मशीन जप्त केली आहे. गुरुवारी (दि. २३) भोसरी पोलिसांनी कासारवाडी येथे ही कारवाई केली.
प्रशांत रोहीदास कुमकर (वय २९, रा. आंगळांबे, ता. हवेली), संकेत रामचंद्र भडाळे (वय २८), श्रीधर पोपट रायकर (वय २६), निखिल अशोक पायगुडे (वय २८, तिघे रा. धायरी) अशी अटक आरोपींची नवे आहेत.
भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी गणेश सावंत गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी कासारवाडी येथील एका हॉटेलजवळ चारचाकी वाहनातून गुटख्याची वाहतूक करीत आहे, अशी माहिती सावंत यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी चारचाकी वाहन ताब्यात घेतले. वाहनात १ लाख ९, हजार ७२० रुपयांचा गुटखा मिळाला. चारही आरोपींना ताब्यात घेतले. अधिक तपास केला असता त्यांनी हा गुटखा घरीच तयार केला असल्याचे सांगितले.


















