रक्तदान, कोरोना तपासणी, नेत्र तपासणीद्वारे सावित्रीबाई फुलेंना आदरांजली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२१) :- स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्यामुळे अनेक स्त्रिया विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. तथापि त्यांचे कर्तव्य बजावताना आपल्या तब्येतीकडे थोड्याफार प्रमाणात प्रकृतीकडे दुर्लक्ष होते, त्यामुळे आज आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामुळे त्यांचे आरोग्य अबाधित राहण्यास निश्चित मदत होईल असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त समाजप्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले. त्याचा प्रारंभ रक्तदान, कोरोना रॅपिड तपासणी, नेत्र तपासणी, शारीरिक तपासणी शिबिराने झाला. त्याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माजी महापौर अनिता फरांदे, अपर्णा डोके, डॉ. वैशाली घोडेकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, वैशाली काळभोर, प्रियंका बारसे, आश्विनी जाधव, नम्रता लोंढे, रेखा दर्शिले, माजी नगरसदस्य वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, मुख्य लिपिक प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे, भाई विशाल जाधव, देवेंद्र तायडे, अॅड. चंद्रशेखर भुजबळ, योगेश लोंढे, गणेश वाळुंजकर, युसूफ कुरेशी, युवराज दाखले, संतोष जोगदंड, शंकर लोंढे, पी के महाजन, हनुमंत माळी, गिरिष महुले, गिरिष वाघमारे, प्रताप गुरव, विजयराव दर्शिले, हाजी रसुल, प्रसाल कुदळे, नसीर शेख, संतोष शिंदे, मारुती काटके, राम जाधव, विशाल शिंदे, मारुती कदम, तेजस्विनी कदम, वैशाली राऊत, सुषमा सोनवणे, अॅड. विद्या शिंदे, वंदना जाधव, सुप्रिया जाधव, रोहिणी रासकर, मिरा कुदळे, अनिता ताटे आदी उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती “महिला शिक्षक दिन” म्हणून राज्यात सर्वत्र साजरी करण्याबाबत शासनाने नुकताच निर्णय घेतलेला आहे. या कार्यक्रमासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती, आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सावित्रीबाई फुले महिला व्यासपीठ, ओबीसी संघर्ष समिती, ओबीसी संघर्ष सेना, महाराष्ट्र परिट सेवा मंडळ, पिंपरी चिंचवड शहर लॉंड्री संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, नागरी हक्क सुरक्षा समिती, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी देखील कार्यक्रम यशस्विततेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.