- लस देण्याच्या प्रात्यक्षिकात घेतला २८ लाभार्थ्यांनी सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२१) :- शासन मार्गदर्शक सुचनेनुसार कोरोना लसीकरणाची ड्राय रन (रंगीत तालीम) देशभर दि.०२ जानेवारी २०२१ रोजी आयोजित करणे बाबत सुचविण्यात आलेले होते. राज्य शासनाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयाची निवड कोरोना लसीकरणाची ड्राय रन ( रंगीत तालीम ) साठी केलेली होती. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्व तयारी करून दि .०२ जानेवारी २०२१ रोजी कोरोना लमीकरणाची ड्राय रन ( रंगीत तालीम ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात आयोजित करण्यात आलेली होती.
ड्राय रन ( रंगीत तालीम ) आयोजना वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, संचालक आरोग्य सेवा डॉ. अर्चना पाटील, अति संचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप पाटील, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ.संजय देशमुख, युनिसेफ मल्लागार डॉ.सतिष डोईफोडे, सर्वेलन्स मेडिकल ऑफिसर डब्ल्यु.एच.ओ. डॉ.चेतन वाडे रिजनल टिम लिडर डब्ल्यु.एच.ओ. डॉ. राहुल शिंपी, लस व शितसाखळी व्यवस्थापक निरज गुप्ता, अति.आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. मंगिता तिरमणी, डॉ. बाळासाहेब होडगर, वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर व पी.एच.एन.शोभा ढोले हे उपस्थित होते.
या ट्राय रन ( रंगीत तालीम ) मध्ये २९ लाभार्थीना लसीकरणासाठी निवडण्यात आलेले होते. त्यामधील २८ लाभार्थी यांचेवर लस देण्याचे प्रात्यक्षिकाची रंगीत तालीम करण्यात आली पण प्रत्यक्षात लस टोचण्यात आलेली नाही. एक लाभार्थी यांनी लसीकरणास नकार दर्शविला याचेही प्रत्यक्षिक या वेळी घेण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर व पी.एच.एन.शोभा ढोले हे उपस्थित होते.
शासन मार्गदर्शक सुचनांनुसार या ड्राय रन ( रंगीत तालीम ) मध्ये २९ लाभार्थीना लसीकरणासाठी निवडण्यात आलेले होते. त्यामधील २८ लाभार्थी यांचेवर लस देण्याचे प्रात्यक्षिकाची रंगीत तालीम करण्यात आली पण प्रत्यक्षात लस टोचण्यात आलेली नाही. एक लाभार्थी यांनी लसीकरणास नकार दर्शविला याचेही प्रत्यक्षिक या वेळी घेण्यात आले. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा या सोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. अशी माहिती अति. आरोग्य वैद्यकिय अधिकारी यांनी दिली.