न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२०) :- फिर्यादी वाकड येथील माय कारमध्ये मॅनेजर पदावर नोकरी करतात. त्यांचे घर शनिवारी (दि. २) रात्री सात ते रविवारी (दि. ३) सकाळी सहा या कालावधीत कुलूप लावून बंद होते.
रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून ५९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ४७० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू, १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला.
नवीनचंद्र तुळशीदास गिरमे (वय ५०, रा. गिरीराज हाऊसिंग सोसायटी, बिजलीनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
















