- मनसेच्या परप्रांतीय मुद्द्यावर भाजपचे बोट..
- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२०) :- शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडल्यानंतर मनसेने हिदुत्वााचा मुद्दा उचलून धरत नवीन राजकीय वाटचाल सुरु केली. यावर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी आपली मते व्यक्त केली. मात्र, आता भाजपने मनसेसोबतच्या युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्राकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांनी मनसेसोबतच्या युतीबाबत पाटील यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीय लोकांबाबत भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत युतीबाबत चर्चा होणार नाही. अद्याप तरी दोन्ही पक्षांच्या पातळीवर युतीची चर्चा करण्यात आलेली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
















