- सहकारी पोलीस कर्मचाऱ्याला देखील दिले ढकलून; दिघीतील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२०) :- मदतीसाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. तसेच, शिवीगाळ करून धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. दिघी रोड, भोसरी येथे शुक्रवारी (दि. १) रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
प्रकाश दिगंबर शिंदे (वय ५९, रा. चाकण) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी उत्तम सायस भताने (वय ४०) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी – चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षात एक फोन आला होता. एक व्यक्ती घरावर दगडफेक करत असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार नियंत्रण कक्षातून भोसरी बिट मार्शलवरील पोलीस कर्मचारी उत्तम भताने यांना सूचना देण्यात आली. त्यानुसार भताने आणि त्यांचे सहकारी दिघी रोड, भोसरी येथील वर्धमान टेरेस येथे पोहोचले. तेथे आरोपी दिसून आला. पोलिसांनी त्याला झाल्या प्रकाराबाबत विचारपूस केली. त्यावेळी आरोपी हा फिर्यादीच्या अंगावर धावून जात गचांडी पकडली. तसेच, फिर्यादी यांचे सहकारी पोलीस कर्मचारी तरडे यांनाही ढकलून देऊन शिवीगाळ करून धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
















