- जबरदस्तीने गल्ल्यावर डल्ला; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२०) :- कोयत्याचा धाक दाखवून लोकांना मारहाण करून लॉटरीच्या दुकानात रोकड काढून घेतली. आता मी इथला डॉन आहे. मी आलो की मला पैसे द्यायचे, नाहीतर मारून टाकीन, अशी धमकी दिली. साने चौक, मोरेवस्ती येथे बालाजी लॉटरी सेंटर या दुकानात शनिवारी (दि. २) सायंकाळी सातला हा प्रकार घडला.
दिनेश मनोहर खरात (वय २२, रा. नेवाळे वस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत विशाल उद्धव गडकर ( वय २२, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हातात कोयता घेऊन फिर्यादी यांच्या लॉटरीच्या दुकानासमोरील कुल्फीच्या गाडीजवळ आला. तेथे त्याने धमकी दिली.
त्यानंतर आरोपीने दुकानातील काउंटरमधून दोन हजार ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तुमच्या मालकाला पण सांगा, मी आलो की मला पैसे द्यायचे. नाहीतर तुमच्या मालकाला पण मारून टाकील , अशी धमकी देत आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या कामगारांना मारहाण केली.
















