न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या विस्तारित कार्यकारिणीला नियुक्ती पत्रांचे वाटप मंगळवारी पिंपरी येथे करण्यात आले. या प्रसंगी नवनियुक्त ५५ जणांची यादी जाहीर करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते युवक पदाधिका-यांना नियुक्त पत्रांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेस नेते अशोक मोरे, प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, प्रदेश सचिव उमेश पवार, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष ॲड उमेश खंदारे व माजी नगरसेवक विश्वास गजरमल आदि मान्यवरांच्या विशेष उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला.
युवक काँग्रेस च्या निवडी ह्या निवडणूकीद्वारे करण्यात येतात मात्र कार्यकारिणी मध्ये नवयुवकांचा सहभाग हा प्रदेश युवक काँग्रेसच्या मान्यतेने करता येतो व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मान्यतेने वरिल निवडी करण्यात आल्या.
या प्रसंगी शहर कार्यकारिणीत नवे १५ पदाधिकारी पिंपरी विधानसभा कमिटीमध्ये १०, भोसरी विधानसभा कमिटी मध्ये १० व चिंचवड विधानसभा कमिटी मध्ये २० युवकांची नियुक्ती करण्यात आली.
नियुक्ती केलेले पदाधिकारी पुढील प्रमाणे :-
शहर जिल्हा सरचिटणीस : गणेश शितोळे, डाॅ. ओमेर खान, निखिल भोईर, राहूल काळभोर, विशाल कसबे, चंद्रशेखर जाधव, मिंलिद बनसोडे, शंकर ढोरे, कु.अपूर्वा इंगवले, रोहन वाघमारे, विशाल सरवदे, स्वप्निल बनसोडे, नियाज खान.
शहर जिल्हा सचिव:- तुषार पाटील व वसीम शेख.
चिंचवड विधानसभा सरचिटणीस :-अमित जगदाळे अविनाश मेश्राम अर्णव कामठे ओंकार पवार मयुर तिखे तेजस पाटील नसीम शेख अश्विन खामकर, अभिषेक रानवडे, श्रेयस गायकवाड, जिफिन जॉनसन, स्नेहल गायकवाड, शैलेश आनंतराव,रोहित शेळके, डेविड श्रीसुंदरन,नीता चामले, सीमा पाटील, स्तुती अडागळे.
भोसरी विधानसभा सरचिटणीस :- सईद खान,अजहर शेख,नफिस खान,नदीम कुरेशी,साहिल शेख,शमीम खान, रियाज चौधरी, मूनसफ अख्तर, मयूर रोकडे.
पिंपरी विधानसभा सरचिटणीस :- हरी निसर्गंध, अनिल सोनकांबळे, राहुल शिंदे,पांडुरंग वीर, विजय बनायत,विवेक भाट, हर्षवर्धन पाढरकर,फारूक खान,दिपक भंडारी.
या सर्व निवडी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी जाहीर केल्या. नियुक्ती पत्रासोबत युवक काँग्रेस चा झेंडा देण्यात आला. या प्रसंगी शहर उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, शहर सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, गौरव चौधरी, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे उपाध्यक्ष सौरभ शिंदे आदि उपस्थित होते.