- सदनिकेसाठी पात्र लाभार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वस्त घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. सदनिकेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना कोरोना लॉकडाऊनमुळे उर्वरित वेळेत जमा करता आलेली नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा ३ महिन्यांची म्हणजे ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा ठराव स्थायी समितीने नुकताच मंजुर केला आहे.
पालिकेच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या भागात स्वस्त घरकुल योजना राबविली जात आहे. या इमारतीतील सदनिकांची संगणकीय सोडत काढून पात्र लाभार्थ्यांना त्याचे वितरण केले जाते. त्यापूर्वी लाभार्थ्यांनी स्वहिस्सा पालिकेकडे जमा करणे आवश्यक असते मात्र, अनेक लाभार्थी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र, कोरोना संक्रमणामुळे उद्योगधंदे ठप्प झाल्याने अनेकांच रोजगार बुडाला आहे.
त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना मुदतीमध्ये रक्कम भरता आलेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांन पुन्हा एकदा ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा ठराव स्थायी समितीने नुकताच घेतला आहे. या वाढीव मुदतीमधे लाभार्थ्यांनी उर्वरित रक्कम अदा करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
















