न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. ०५ जानेवारी) रोजी १४० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ स्त्री- पिंपरी (७३ वर्षे), रहाटणी (५८ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – जुन्नर (७५ वर्षे) येथील रहिवासी आहेत. इग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी ७ प्रवाशांचे नमुने NIV पुणे येथे UK स्ट्रेन करीता जिनोम मिसिगसाठी पाठविले असता ०२ अहवाल नकारात्मक व ०५ अहवाल प्रलंबित आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९७१७५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९३७३८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७६४ जणांचा मृत्यू झालेला आहे.