- एकाचा जागीच मृत्यू तर, एकजण गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ०६ जानेवारी २०२०) :- ग्रेड सेपरेटरमधून वळताना एका टेम्पोची दुचाकीला धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (बुधवारी, दि. ६) सकाळी नऊ वाजता एम्पायर इस्टेट पुलाजवळ चिंचवड येथे झाला.
एम्पायर इस्टेट पुलाच्या जवळ मेट्रोचे काम सुरु आहे. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पिंपरीकडून पुण्याकडे जाणारा एक ४०७ टेम्पो एम्पायर इस्टेट पुलाच्या खालच्या बाजूला ग्रेड सेपरेटरमधून महामार्गावर वळण घेत होता. त्यावेळी टेम्पोची एका दुचाकीला धडक बसली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
















