- भोसरी – टेल्कोरोडवरील अनधिकृत शेड हटविले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ०६ जानेवारी २०२०) :- औद्योगिक वसाहतीमधील एमआयडीसीच्या अनेक भूखंडांवर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे निष्कषित करण्यासाठी एमआयडीसीच्या वतीने मंगळवारी (दि. ५) विशेष मोहीम राबविण्यात आली.
चिंचवड कार्यालयाने मंगळवारी (दि. ५) भोसरी – टेल्कोरोडवरील अनधिकृत शेडवर कारवाई केली. महापालिकेचे अधिकारीदेखील याठिकाणी आले होते. या कारवाईकरिता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तर एमआयडीसीच्या नोटिशीनंतर बहुतांशी व्यावसायिकांनी अतिक्रमण काढून घेतल्याचे दिसून आले. यावेळी एमआयडीसी महापालिकेच्या अधिकृत परवान्याची पडताळणी करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली .