न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ०६ जानेवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. ०६ जानेवारी) रोजी १५१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ०२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १ पुरुष रुग्ण पिंपळे सौदागर ६० वर्षे, १ स्त्री – थेरगाव (५९ वर्षे) येथील रहिवासी आहेत. इग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी ७ प्रवाशांचे नमुने NIV पुणे येथे UK स्ट्रेन करीता जिनोम मिसिगसाठी पाठविले असता ०२ अहवाल नकारात्मक व ०५ अहवाल प्रलंबित आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९७३२६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९३८४३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७६६ जणांचा मृत्यू झालेला आहे.











