- राजकीय दबावापुढे पालिका आयुक्तांची सपशेल माघार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ०६ जानेवारी २०२०) :- सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवकांच्या राजकीय दबावापुढे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माघार घेत उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंत्याच्या बदली आदेशाला बुधवारी( दि. ६)) तीन महिने स्थगिती दिली आहे.
महापालिका आयुक्तांनी २५ उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्याचा २४ डिसेंबर २०२० रोजी केलेला बदली आदेशाला ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगिती आदेश दिला आहे.
स्थापत्य विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता संवर्गातील अधिकारी व कर्मचारी २४ डिसेंबर २०२० च्या आदेशाने केलेले स्थानांतरण प्रशासकीय कारणास्तव ३१ मार्च २०२१ अखेर स्थगिती देत आहोत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानांतरणाचे पूर्व विभागात तात्काळ रुजू होऊन कामकाज करावे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.











