- शहर मनसेचे पालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२०) :- रूपीनगर, तळवडे परिसरातील अर्धवट कामे पूर्ण होत नाहीत. ७ दिवसांचा अल्टीमेटम देवूनही कामाला सुरवात होत नाही, आदी मागण्यांसाठी शहर मनसेने पालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन केले.
शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात रूपेश पटेकर (शहर सचिव), राहुल जाधव (शहर सचिव), विशाल मानकरी (उपशहराध्यक्ष), चंद्रकांत दानवले (उपशहराध्यक्ष), राजू सावळे (उपशहराध्यक्ष), मयूर चिंचवडे (विभाग अध्यक्ष – चिंचवड), दत्ता देवतरासे (विभाग अध्यक्ष पिंपरी), सुशांत साळवी (शहराध्यक्ष-म.न.वा.से.) यांच्या नेतृत्वात राजू भालेराव (शहराध्यक्ष-जनहित कक्ष), आश्विनीताई बांगर (शहराध्यक्ष-महिला सेना), सीमाताई बेलापुरकर (शहर सचिव – महिला सेना), अनिता पांचाळ (उपशहराध्यक्ष – महिला सेना), संगीताताई देशमुख (उपशहराध्यक्ष – महिला सेना), स्नेहलताई बांगर (उपशहराध्यक्ष – महिला सेना), विष्णु चावरीया (शहर संघटक), सचिन मिरपगार (उपविभाग अध्यक्ष), सुरेश सकट (उपविभाग अध्यक्ष), सुरज जाधव, रवि जाधव, पंकज दळवी, गणेश उज्जनकर (प्रभाग अध्यक्ष), प्रविण माळी, देवेंद्र निकम, कुलदीप रानडे, बालाजी पांचाळ, नारायण पठारे, दत्ता धर्मे, सागर सोनटक्के, प्रतिक शिंदे, नागेश पाटील तसेच अनेक मनसैनिक उपस्थित होते.
प्रभागात कामे चालू आहेत. परंतु, कामे करत असताना रस्त्यांवरील खड्डे मात्र बुजवले जात नाहीत. अर्धवट कामे पूर्ण न करता नवीन कामांना सुरवात होते. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. नवीन वर्ष सुरु होण्याआधी डांबरीकरण व सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यास सात दिवसाचा अल्टीमेटम देऊनही काम होत नाही अशा आदी मागण्यांसाठी मनसेकडून आंदोलन करण्यात आले.