- अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ यांच्या शिस्तप्रिय कर्तव्याची आणखी एक झलक
- बँकेच्या कामगिरीत रोवला आणखी एक मानाचा तुरा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसें.) :- क्रीडा भारती पुणे महानगर आयोजित ‘सहकार करंडक’ सन २०१८-२०१९ कबड्डी स्पर्धेत धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप. बँकेने दणदणीत विजय मिळवला आहे.
शिवाजीनगर येथे गुरुवार दि. ०६ ते ९ डिसें. रोजी मॉडर्न कॉलेजच्या प्रांगणात ‘सहकार करंडक’ या कबड्डी स्पर्धा पार पडल्या आहेत. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील एकूण १६ सहकारी बँकांनी सहभाग नोंदविला होता. साखळी सामन्यांमध्ये धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप. बँकेने जनसेवा सहकारी बँक-ब, संत सोपानकाका सहकारी बँक-अ, जनता सहकारी बँक – अ, जनसेवा सहकारी बँक – अ या प्रतिस्पर्धी बँकांचा दणदणीत पराभव करून, अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला होता.
या स्पर्धेचा अंतिम सामना धर्मवीर बँक विरुद्ध पुणे पिपल्स बँक यांच्यामध्ये पार पडला. अटीतटीच्या सामन्यात धर्मवीर बँकेने पुणे पिपल्स बँकेचा १९/८ गुणांक मिळवीत ११ गुणांच्या फरकाने पिपल्स बँकेचा दणदणीत पराभव केला असून, ऐतिहासिक विजय मिळविला आहे. ‘सहकार करंडक’ सन २०१८-२०१९ कबड्डी स्पर्धेच्या करंडकावर धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप. बँकेने आपले नाव कोरले आहे.
स्पर्धेसाठी बँकेचे अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ, उपाध्यक्ष विजय देशमुख, संचालक शांताराम देशमुख, दिलीप तनपुरे, आदिनाथ शितोळे, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे, बँकेचे व्यवस्थापक आसाराम खैरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.












