- शहरात आज १४६ जणांना कोरोनाची बाधा; १५४ रुग्णांना डिस्चार्ज, १ रुग्णाचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ०७ जानेवारी) रोजी १४६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे १ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ स्त्री – निगडी (४६ वर्षे) येथील रहिवासी आहेत. इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी ७ प्रवाशांचे नमुने NIV पुणे येथे UK स्ट्रेन करीता जिनोम सिझेसिंगसाठी पाठविले असता ०३ अहवाल नकारात्मक आढळले असुन ०३ अहवाल UK स्ट्रेन B.१.१.७ करीता सकारात्मक असून तिघांची प्रकृती चांगली आहे व ०१ अहवाल प्रलंबित आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९७४४२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९३९९७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७६७ जणांचा मृत्यू झालेला आहे.