- अर्थसंकल्पावर प्राधिकरण विलीनीकरणाचे सावट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा येत्या १३ तारखेला आर्थिक वर्ष २०२१-२२ चाअर्थसंकल्प प्राधिकरण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
प्राधिकरणाचा अर्थसंकल्प हा शिलकी रकमेचा असतो. गतवर्षी २०२०-२१ मध्ये ६४० कोटी ८८ लाख १० हजार रुपये जमा – खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यामध्ये ६४० कोटी ८२ लाख ९२ हजार एवढा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. म्हणजेच ५ लाख १८ हजार शिलकी रकमेचा हा अर्थसंकल्प होता.
दरम्यान, आगामी अर्थसंकल्पही शिलकी रकमेचाच राहण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात नव्याने विकासकामांसाठी काय नियोजन ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


















