- अन्नधान्य वितरण विभागाचे शहरवासियांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२१) :- ३१ जानेवारी २०२१ पूर्वी प्रत्येक रेशनकार्डमधील लाभार्थ्यांचे १०० टक्के आधार सिडींग व किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिद्ध करण्याच्या उद्दीष्टाने पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातील ११ परिमंडळ कार्यालयात मोहिम राबविण्यात येत आहे. रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक करावे, असे आवाहन अन्नधान्य वितरण विभागाने केले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्न योजनेचे पुणे व पिपरी – चिंचवड शहरात एकुण १३ लाख ३२ हजार ८७१ इतके लाभार्थी असून १० लाख ६१ हजार इतक्या लाभार्थ्याचे आधार सिडिंग झालेले आहे.
रास्तभाव दुकानातील ई – पॉस उपकरणांमधील eKYC व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. या उद्दीष्टाने पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातील परिमंडळ कार्यालयात मोहिम राबविण्यात येत आहे.