न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सध्या देशभर गाजत असलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांविरोधात सुमारे ४४ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनातील शहीद झालेल्या निष्पाप ५७ शेतक-यांना मेणबत्ती प्रज्वलित करून श्रध्दाजंली वाहण्यात आली.
भारतीय युवक काँग्रेस कडून आज देशभर “एक दिया शहीदो के नाम” हा कार्यक्रम घेण्यात येत आहे या अनुषंगाने पिंपरी चौकात सायंकाळी ठिक ६ वा मेणबत्ती प्रज्वलित करून ६ मिनिटे श्रध्दाजंली वाहण्यात आली.
यावेळी काँग्रेस नेते अशोक मोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शहर सरचिटणीस अंनिल सोनकांबळे, मिलिंद बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, प्रविण जाधव, विजय बानाईत, अर्णव कामठे, मयूर तिखे, अमित जगदाळे, राकेश संपागे, सुभाष वाघमारे, आकाश जाधव, बाळासाहेब डावरगावे, शमीम खान, सोहेल चौधरी आदि पदाधिकारी उपस्थित होते.