- पोलिसांपुढील चिंता वाढली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२१) :- भोसरी परिसरात दोन, तर हिंजवडी आणि चिखली परिसरातून एक-एक मोबाइल फोन हिसकावल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत रविवारी (दि. १०) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
उत्तम निवृत्तीराव नामाजी (वय २६, रा. बोराटे वस्ती, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उत्तम यांचा पाच हजारांचा मोबाइल फोन २३ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास इंद्रायणीनगर, भोसरीमधील इंद्रा डेअरी समोरील रोडवरून दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला.
तीन विजय शिवाजी इष्टे (वय ३०, रा. परांडेनगर, दिघी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २६ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास मोबाइलवर बोलत पायी जात होते. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर दुचाकीवरील दोन चोरट्यांनी त्यांचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून नेला. उत्तम सौरभ संभाजी पाटील (वय २३, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील ९ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता बावधन येथील डॉमिनोज समोरील दुकानाजवळून पायी चालत जात होते. मोबाइल फोन खिशात ठेवत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून ४० हजारांचा मोबाइल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला.
चैत्राली भूषण हिरे (वय २७, रा. शरदनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ९ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता त्यांच्या घराजवळ थांबल्या होत्या. त्यावेळी एमएच – १२ – बीजे ०३८१ या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना धक्काबुकी करून आठ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला.