- राज्यातील उत्तम नाट्यगृहांमध्ये होणार या नाट्यगृहाची गणना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२१) :- निगडी प्राधिकरणारातील ग. दि. माडगूळकर या नाट्यगृहाच्या बांधकामाची सिनेअभिनेते भरत जाधव आणि नाट्य अभिनेते जयराज नायर यांनी रविवारी (दि. १०) पाहणी केली.
या पाहणीदरम्यान नाट्यगृहातील प्रस्तावित सोयीसुविधांची माहिती घेत, राज्यातील उत्तम नाट्यगृहांमध्ये या नाट्यगृहाची भर पडणार आहे, असे गौरवोद्गार जाधव यांनी काढले.
या नाट्यगृहात केवळ नाट्यप्रयोगच नव्हे, तर नाट्यप्रयोगापूर्वी कलाकारांची एकत्रित बैठक व्हावी, यासाठी कॉन्फरन्स हॉलचे काम सुरू आहे. याशिवाय मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीतील नाट्यप्रयोगासाठी आटोपशीर मिनी थिएटर, रेस्टॉरंट अशा विविध सुविधांचा आढावा घेतला. या सुविधा पुरवित असल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे कौतुकही केले.