- मात्र, चौदा दिवसांचे होम क्वारंटाईन बंधनकारक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२१) :- कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच ब्रिटनमधील एकूण सात जण पॉझिटिव्ह आढळले होते. तर त्यातील तीन जण नवीन कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. उपचारानंतरही या तिन्ही रुग्णांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडले आहेत. त्यांना चौदा दिवस होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे.
सुरुवातीला ब्रिटनहून आलेल्या २६८ जणांची तपासणी केली. त्यापैकी २७ डिसेंबरला सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असताना त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. ब्रिटनवरून आलेल्या प्रवाशांची प्रकृती ठणठणीत असल्याने सतरा दिवसांचे आयसोलेशन पूर्ण झाल्यानंतर सातही जणांना डिस्चार्ज दिला आहे. मात्र, त्यांना आणखी चौदा दिवसांचे होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे.