न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२१) :- केशवनगर येथील गृहसंस्थेतील दहा वाहने पेटवून देणाऱ्या माथेफिरुस चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ऋतूराज भैरवसिंग घोरपडे ( रा. काकडे टाऊनशिप, केशवनगर, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे.
केशवनगरमधील काकडे टाऊनशिपमध्ये १३ जानेवारीला पहाटे पावणेतीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सोसायटीमधील वाहने जाळली होती. त्यात ९ मोटारसायकल आणि एक सायकल जळून खाक झाली होती. तसेच आगीमुळे सोसायटीच्या वाहनतळाचा स्लॅब तापून त्याला भेगा पडल्या. स्लॅबच्या सिमेंटचे टवके उडून खाली पडले.