- सोमवारपासून जिल्हाधिकारी, तहसीलदारांना देणार निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२१) :- गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा विषय चर्चेला येत आहे. महिलेने केलेल्या आरोपानंतर जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे गरजेचे होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्या राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी
सोशल मीडियाद्वारे दिली. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदारांना देखील निवेदन देणार असल्याचे उमा खापरे यांनी सांगितले.
येत्या सोमवारपासून भाजपा महिला मोर्च्याकडून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून मुंडे यांना मंत्री पदावर का ठेवले या बाबत जाब विचारणार असल्याचा इशारा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे दिला.