न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२१) :- शिवसेना शाखा ताम्हाणेवस्ती व लोककल्याण आरोग्य केंद्र आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नेञचिकित्सा व चष्मे वाटप शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात २१० नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला.
या शिबिरास जिल्हासंघटिका सुलभा उबाळे, सर्जेराव भोसले, अनिल सोमवंशी, नितीन बोंडे, अमित शिंदे, सहदेव चव्हाण, रमेश पाटोळे व शिवसैनिक उपस्थित होते. शिबिराचे आयोजन शिवसेना शाखाप्रमुख प्रविण धोंडाप्पा पाटील यांनी केले. यास शिवसेना पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.