- शहीद जवान संभाजी राळे कुटुंबीयांस एक लाखाची आर्थिक मदत..
- महापालिका, महेशदादा स्पोर्टस् फौडेशन व इतर संघटनांचा स्तुत्य उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी येथील गावजत्रा मैदान याठिकाणी १० आणि २५ किलोमीटरच्या सायक्लोथाॅनचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते पार पडले.
यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे,आयुक्त श्रावण हर्डीकर, कर्नल टी.एस.धामी, विधी समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समिती सभापती सोनाली गव्हाणे, क्रिडा,कला आणि सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, क प्रभाग अध्यक्ष राजेंद्र लांडगे, फ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, इ प्रभाग अध्यक्ष विकास डोळस,नगरसदस्य विलास मडिगेरी, ॲड.नितिन लांडगे, लक्ष्मण सस्ते, नगरसदस्या निर्मला गायकवाड, नम्रता लोंढे,सारिका लांडगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सतिश इंगळे, प्रविण्र लडकत,प्रमोद ओंभासे, बापू गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, अविरत श्रमदानचे डाॅ.निलेश लोंढे, सायकल मित्र संघटनेचे बापू शिंदे, प्रियदर्शनी स्कूलचे नरेंद्र सिंग, महेशदादा स्पोर्टस् फौडेशनचे शेखर लांडगे, रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरीचे रमेश सातव, संस्कार प्रतिष्ठानचे डाॅ. मोहन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजीव भावसार, कार्तिक लांडगे, सचिन लांडगे, आणि त्यांचे सहकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. भागातील शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांना सर्व मान्यवर तसेच सायकलपटूंनी श्रध्दांजली वाहिली. शहीद राळे यांचे कुटुंबीयांना अविरत श्रमदान संस्थेतर्फ एक लाख रुपयांचा धनादेश यावेळी कर्नल टी.एस.धामी यांचे हस्ते देण्यात आला. महापौर माई ढोरे यांनी सर्व सायकलपटूंना शुभेच्छा दिल्या. शहर प्रदुषणमुक्त करण्याची शपथ देखील यावेळी सर्वांनी महापौर यांचे समवेत घेतली.
पिंपरी चिंचवड शहराने भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या इंडिया सायकल्स फाॅर चेंज या उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, प्रियदर्शनी स्कूल, महेशदादा स्पोर्टस् फौडेशन यांचे संयुक्त विद्यमाने प्रदुषण मुक्ततेच्या जनजागृतीसाठी सायक्लोथाॅनचा हा कार्यक्रम पार पडला.
१० किलोमीटर सायकलिंग साठी गावजत्रा मैदान-जय गणेश साम्राज्य चौक-इंद्रायणी स्वीट काॅर्नर- एम.आय.डी.सी. ब्लाॅक ते परत गावजत्रा मैदान आणि २५ किलोमीटर सायकलिंग साठी गावजत्रा मैदान-जय गणेश साम्राज्य चौक-साने चौक-संत नगर-इंद्रायणी स्वीट काॅर्नर-एम आय डी सी ब्लाॅक ते परत गावजत्रा मैदान असा सायक्लोथाॅनचा मार्ग होता. यामध्ये पाच हजारहून अधिक सायकलपटू टप्याटप्याने डिस्टंन्सिंगचे पालन करून सहभागी झाले होते.