न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. १७ जानेवारी) रोजी १२३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे दिघीतील एका ८० वर्षीय स्त्री रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९८८६१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५५६३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७८६ जणांचा मृत्यू झालेला आहे.