शहराध्यक्ष सचिन चिखलेंकडून विजयी खेळाडूंचे अभिनंदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२१) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना भोसरी विधानसभेच्यावतीने मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यमुनानगरमधील ठाकरे उद्यानात भव्य पासिंग हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे मावळ तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर व मनविसे शहराध्यक्ष हेमंत डांगे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये भोसरी विधानसभेतील तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील नामवंत ११ टिमने सहभाग घेतला होता. या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक महाराजा व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लब यांनी पटकावले तर द्वितीय पारितोषिक ज्ञानप्रबोधिनी शाळेतील विद्यार्थ्यांनी पटकावले.
या स्पर्धेत विद्यार्थिनी देखील सहभागी झाल्या होत्या. प्रथम परितोषीक देहूरोड आर्मी कॅम्प मधील विद्यार्थिनींनी पटकावले व द्वितीय पारितोषिक ज्ञान प्रबोधिनी शाळेतील विद्यार्थिनींनी पटकावले. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व सर्वाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष राजु सावळे, विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, प्रतीक शिंदे, भोसरी विधानसभेतील सर्व प्रभागाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रभागाध्यक्ष देवेंद्र निकम, सागर सोनटक्के यांनी तर, पाहुण्याचे व खेळाडुचे स्वागत अंकुश तापकीर यांनी केले.