- विजयी मिरवणुका काढण्यास बंदी; अन्यथा होणार गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२१) :- मावळ तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या ३१६ जागांसाठी आज सोमवारी (दि. १८) सकाळी दहा वाजता तळेगाव दाभाडे येथील पै. विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुल येथे मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीनंतर विजयी मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली. मतमोजणी केंद्र परिसरात कोणत्याही प्रकारची हत्यारे तसेच परवाना असलेली कोणत्याही प्रकारची अग्निशस्त्र घेऊन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी परिसरात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्तींवर कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.