- क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महापौर उषा ढोरे यांच्या शुभहस्ते संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. जानेवारी २०२१) :- नवी सांगवीतील सुपर स्टार क्रिकेट क्लब व शिवराज क्रिकेट क्लबने आयोजित केलेला भव्य टेनिस बॉल क्रिकेट ‘महापौर चषक ‘ देहूरोड येथील हनुमान मित्र मंडळाने पटकाविला आहे. त्यांना भव्य चषक आणि ५५ हजार ५५५ रुपयांचे बक्षिस देण्यात आले. ” महापौर चषक ” क्रिकेट स्पर्धचे बक्षीस वितरण समारंभ महापौर उषा ढोरे याच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका सीमा चौगुले, माधवी राजापुरे, माऊली जगताप, धनंजय ढोरे, अजय दुधभाते, जवाहर ढोरे, गणेश बनकर उपस्थित होते. सुपर स्टार क्रिकेट क्लब व शिवराज क्रिकेट क्लबतर्फे पाच दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. १३ ते १७ जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत एकूण ३३ संघानी सहभाग घेतला.
वारजेतील आलम भाई पठाण क्रिकेट क्लबने द्वितीय बक्षिस मिळविले. त्यांना चषक आणि ४४ हजार ४४४ रुपयांचे बक्षिस देण्यात आले. दापोडीतील ओम साई क्लब व थेरगावातील जय गणेश क्रिकेट क्लबने अनुक्रमे तृतीय, चतुर्थ क्रमांक पटकाविला. आनंद चव्हाण मालिकावीरचा मानकरी ठरला. उत्कृष्ट फलंदाज राहुल लोहार, उत्कृष्ट गोलंदाज हरिश अर्जुन ठरले.
स्पर्धेचे संयोजन राहुल कोंढरे, सत्यवान भालेराव, समीर जाधव, विनोद कल्याणकर, जीवन जाधव यांनी केले.