- अज्ञात चोरट्याविरोधात दोन्ही चौकीत गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. जानेवारी २०२१) :- भोसरी व निगडीमधून दुचाकी वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. संदेश मारुती डुंबरे (वय ४६, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
डुंबरे यांची १५ हजारांची दुचाकी (एम एच १२ / सी क्यू ०१०४) अज्ञात चोरट्यांनी पीएमटी चौक, भोसरी येथून चोरून नेली. हा प्रकार १३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ या कालावधीत घडला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
सागर बाळासाहेब बोराडे (वय ३१, रा. निगडी गावठाण) यांची ३० हजारांची दुचाकी (एम एच १४ / ई एक्स ००५९) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मधून चोरून नेली. हा प्रकार शनिवारी (दि. १६) दुपारी साडेतीन ते रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडला. बोराडे यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.