न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. १८ जानेवारी) रोजी ८७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरीतील एका ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचा तर, हद्दीबाहेरील बालेवाडीतील ६५ वर्षीय पुरुष तसेच खेडमधील ६२ वर्षीय स्त्रीचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९८९४८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५६२३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७८७ जणांचा मृत्यू झालेला आहे.