- आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत २०७ बालवाडी आहेत. त्यात बालवाडी शिक्षिका मानधनावर गेली ३२ ते ३३ वर्षांपासुन टप्याटप्याने कार्यरत आहेत. त्या कमी वेतनामध्ये कामकाज करीत आहेत.
त्यांना पगार दाखला मिळत नसल्याने बँका / वित्तीय संस्थांकडून कर्ज योजना मिळत नाही. पगार दाखला मिळावा, अशी त्यांची अनेक वर्षांपासुनची मागणी आहे. महापालिकेने त्यांची मागणी पूर्ण करून त्यांना पगार दाखला द्यावा, अशी मागणी उपमहापौर केशव घोळवे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.