- स्थायीकडून प्रशासनाला सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात नव्याने विकसित झालेले रस्ते, उड्डाणपूल, चौक, उद्याने, मिळकतींना नाव देण्याचा अधिकार संबंधित क्षेत्रीय समितीला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागाने लवकर स्वतंत्र धोरण तयार करावे, असे निर्देश स्थायी समितीने प्रशासनाला दिले आहेत.
क्षेत्रीय समितीच्या सभेत त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते, चौक, उड्डाणपूल, उद्याने आणि मिळकतींचे नामकरण केले जाते; मात्र भूमी आणि जिंदगी विभागाच्या जानेवारी २०२० च्या परिपत्रकानुसार पालिका नामकरणाबाबत स्वतंत्र धोरण निश्चित करीत नाही तोपर्यंत क्षेत्रीय समिती सभेत नामकरणाचे ठराव मंजूर करण्यात येऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.