- शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२१) :- राज्यातील महाविकास आघाडीच्या दिलासामुळे थकीत शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना विलंब दंड १०० टक्के माफ करावा.
त्यामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सोमवारी (दि. १८) केली आहे. महाविकास आघाडी सरकारने थकीत शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर स्वीकारण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेस नुकतेच दिले आहेत.
त्यामुळे शेकडो नागरिकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. असंख्य नागरिक मूळ मिळकतकर भरण्यास तयार झाले आहेत. मात्र, पालिकेने त्यांना विलंब दंड आकारला आहे. तो दंड माफ करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.