- ‘फ्लिपकार्ट’कडून तरुणाची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२१) :- ‘फ्लिपकार्ट’ या संकेतस्थळावर मोबाईल ऑर्डर केल्यानंतर ग्राहकाला मेण भरलेल्या कव्हरची डिलिव्हरी करण्यात आली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. १८) सायंकाळी विनोदेवस्ती, वाकड येथे उघडकीस आला आहे.
वाकड येथील महेश विनोदे या तरुणाने पाच दिवसांपूर्वी ‘ फ्लिपकार्ट ‘ या संकेतस्थळावर ‘ सॅमसंग ‘ कंपनीचा २६ हजार रुपये किमतीचा मोबाईल ऑर्डर केला. त्यासाठी त्यांनी क्रेडिट कार्डद्वारे आगाऊ पैसे भरले.
त्यानंतर सोमवारी एका कुरिअर कंपनीचा डिलिव्हरीबॉय त्यांच्या पत्त्यावर मोबाईलचे पार्सल देऊन गेला. विनोदे यांनी घरी आल्यानंतर पार्सल उघडून पाहिले असता त्यांना एका कव्हरमध्ये मोबाईलच्या वजनाचे मेण भरलेले असल्याचे दिसून आले.


















