न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. जानेवारी २०२१) :- मुंबईतील आखिल भारतीय सेना पक्षाच्या कार्यालयात ९ जानेवारी रोजी पक्षाध्यक्षा आशाताई गवळी (मम्मीसाहेब) यांनी सागर फुगे यांना पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्र अध्यक्ष पदाची जबाबदारीचे नियुक्तीपत्र असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रदान केले. पक्षावाढीसाठी एक दिलाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सृष्षिनिर्माते महादेव, स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना स्मरून गोरगरिब जनतेसाठी, दिन दुबळयाच्या हक्कासाठी गोमाता सरंक्षणाकरिता सतत प्रयत्नशील राहील व पक्षप्रमुख अरुणभाई गवळी यांचे हात बळकट करून पक्षाची उंची वाढवण्याचे प्रयत्न करीन, असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष सागर फुगे यांनी दिले.
यावेळी उद्योजक सिंकदर इनामदार, नितिन मुळूक, सतिश फुगे, सुरज फुगे, अतुल शिंदे, साई वाघमारे, बाळा कांबळे, सुरज माने, गणेश फुगे, मितेश साकोरे, जयेश फुगे, गणेश लांडे, हरीश लांडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.