- आज ११३ जणांना कोरोनाची बाधा; तर, ८४ रुग्णांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. २० जानेवारी) रोजी ११३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड व हद्दीबाहेरील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९९१४२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५८५५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७८९ जणांचा मृत्यू झालेला आहे.