- पोलिसांकडून २५ जणांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२१) :- चिंचवड स्टेशन परिसरात सुरु असलेल्या अवैध ऑनलाइन लॉटरी सेंटर आणि दोन व्हिडीओ गेम पार्लरवर पिंपरी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल करीत २ लाख ८४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कारवाई करण्यात आलेल्या २५ पैकी २२ जणांना अटकपूर्व जामिनावर सोडण्यात आले आहेत. तर तीनजण अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. चिंचवड स्टेशनच्या समोर शिवाजी चौकात गवळी वाडा येथील एमबी क्लासिक बिल्डिंगमध्ये भाग्यश्री ऑनलाईन लॉटरी, जय महाराष्ट्र व्हिडीओ गेम, ओम व्हिडीओ गेम, राजश्री ऑनलाईन लॉटरी सेंटर आणि राजू लॉटरी सेंटर येथे ऑनलाइन जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार, पिंपरी पोलिसांनी पाच दुकानांवर छापे मारले. या कारवाईमध्ये पोलिसांनी जुगाराची साधने आणि रोकड असा एकूण २ लाख ८४ हजार २३० रुपयांचा ऐवज जप्त केला.