- बारावीची परीक्षा २३ तर, दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जानेवारी. २०२१) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणार्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्या. बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून तर, दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे बारावीचा निकाल जुलै तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचे गायकवाड यांनी जाहीर केले.
कोविड १९ संदर्भात केंद्र व राज्य सरकारने तसेच आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून परीक्षा घेण्यास मान्यता दिल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षा कशा होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेल्या तारखांमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


















