- भोसरीतील बालनगरी प्रकल्प रद्द करून काय साध्य होणार..
- माजी आमदार विलास लांडेचा आयुक्तांना सवाल?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जानेवारी २०२१) :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनातून औद्योगिक परिसरात बालनगरी प्रकल्प उभारावा याच्यासाठी फार मोठे प्रयत्न केले व त्या प्रकल्पाची निविदादेखील काढली. त्यावर आर्थिक खर्चही केला आहे. पिंपरी चिंचवड शहरातच नव्हे तर पुणे जिल्हयातीलल एक भूषणावह असा हा बालनगरी प्रकल्प तयार होणार होता. परंतु, काही प्रसारमाध्यमामधुन बालनगरी प्रकल्प रद्द होणार, अशा प्रकारच्या बातम्या आल्यानंतर हा प्रकाल्प गुंडाळण्यात आला व त्या जागेवर आता कला अकादमी उभारण्यात येणार आहे, अशा आशयाच्या बातम्या पेपरमध्ये छापण्यात आल्या आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात अगोदरच निगडी, संभाजीनगर, संत तुकारामनगर अशा तिन्ही ठीकाणी संगीत कला अकादमी सुरु असताना पुन्हा नव्याने संगीत कला अकादमी तयार करण्याचा का घाट घातला जातो हे कळत नाही.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निगडी चौकातील मधुकर पवळे पुतळ्यामागील इमारतीत संगीत कला अकादमी आहे. ती सध्यस्थितीत चालू आहे किंवा नाही आणि जर ती चालु असेल तर दुसरी नवीन संगीत कला अकादमी कशासाठी याचीसुध्दा शहरातील नागरिकांना माहिती मिळावी. त्याचप्रमाणे मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री यांचा बालनगरी प्रकल्पामागचा असा मानस होता की, लहान मुलापासुन ते जेष्ठ नागरिकापर्यंत महिलांसाठी सरकारी, निमसरकारी, उद्योगपती कामगार दिन दलितांसाठी एक चांगला ज्ञानात भर पाडणारा व शहराची बौद्धिक उंची वाढविण्यासाठी हा प्रकल्प झाला पाहिजे, असे माजी आमदार विलास लांडे यांनी पालिका आयुक्त हर्डीकर व राज्याचे मुखमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


















