- रेणू शर्माकडून मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जानेवारी. २०२१) :- बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतल्याचं वृत्त आहे.
कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशाप्रकारे पोलिसांना तिने काल (दि. २१) लेखी निवेदन दिलं असल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे. प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्माने म्हटलंय.
काही दिवसांपूर्वीच रेणू शर्माने, “मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते”, असं ट्विट केलं होतं. त्यानंतर आता तिने तक्रार मागे घेतली आहे.


















