- महापौर उषा ढोरे यांची आयुक्त हर्डीकरांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खाजगी चारचाकी वाहनांतून प्रवास करणा-या प्रवाशांनी सक्तीने मास्क घालण्याची अट वगळून कुटुंबासमवेत विना मास्क प्रवास करण्याची मुभा मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे.
सध्या मुंबई पाठोपाठ पुणे शहरात देखील कुटुंबासोबत खाजगी वाहनाने विनामास्क प्रवास करण्यास मुभा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळे खाजगी चारचाकी वाहनातून कुटुंबासमवेत प्रत्यक्ष प्रवास करत असताना मास्क घालण्यावरील बंधन उठवून पुणे शहराप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांना दिलासा देण्याबाबत पालिका आयुक्तांनी संबंधितांस योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


















