- वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जानेवारी २०२१) :- मुलासमोरच आईचा विनयभंग केला. तसेच त्या दोघांनाही शिवीगाळ केली. याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रहाटणी फाटा, काळेवाडी येथे शनिवारी (दि. १६) रात्री घडली.
मंगेश आकाराम यादव (वय ३४, रा. पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने गुरुवारी (दि. २१) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी यादव याने फिर्यादी महिलेला फोन केला होता. तो फोन तिने उचलला नाही. तसेच आरोपीचा फोन आल्याचे तिने आपल्या मैत्रिणीला सांगितले. या कारणावरून चिडलेला आरोपी शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पीडित महिलेच्या घरी गेला. महिलेच्या मुलासमोरच तिच्या अंगावरील कपडे फाडले, तसेच त्या दोघांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली.