- सहा दुचाकी चोरीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात सहा दुचाकी वाहने चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहन चोरीचे तीन गुन्हे भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यापैकी दोन गुन्ह्यात भारती दत्तात्रय काजळे (वय ४०, रा. भोसरी गावठाण) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
१६ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन वाजताच्या दरम्यान भोसरीतील राजमाता जिजाऊ उडाणपुलाखालून चोरट्यांनी फिर्यादी यांची ३० हजार रुपये किंमतीची एमएच – १४ – ईक्यू -५६६९ ही दुचाकी आणि अन्य एका नागरिकाची ३५ हजार रुपये किंमतीची एमएच- १४ – एचएल -८३७० ही दुचाकी चोरून नेली. संदीप शिवाजी राऊत (वय ३६, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची पाच हजार रुपये किंमतीची एमएच – १४ – एके – ९७६९ ही दुचाकी चोरून नेली आहे. गोरख भानुदास सावंत (वय ४७, रा. लक्ष्मी नगर, मोशी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची १० हजार रुपयांची एमएच – १४ – यु -०२२७ ही दुचाकी वल्लभनगर एसटी स्टॅण्डमधून चोरून नेली. निलेश भिकू भोईट ( वय ४२, रा. राजे शिवाजीनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची ३० हजार रुपयांची एमएच – १४ – ईएन ६४०९ ही दुचाकी सोसायटीच्या राहत्या गेट बाहेरून चोरून नेली. नवनाथ गौरीहार पाटोळे ( वय ३१, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची ३० हजार रुपये किंमतीची एमएच १४ डीसी – ९८३२ ही दुचाकी चोरट्यांनी निर्मल स्कूल, काळेवाडी येथून चोरून नेली आहे.


















