- सामाजिक कार्याची दखल घेऊन सोपविली जबाबदारी..
- भाजयुमोबरोबरच युवा वॉरीयर्सच्या कार्याला होणार सुरूवात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. जानेवारी २०२१) :- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांनी या पदावर राहून केलेल्या उल्लेखनिय कामाची पोचपावती म्हणून त्यांची युवा वॉरीयर्सच्या महाराष्ट्र राज्य संयोजकपदी नियुक्ती केली आहे. मुंबई येथील भाजपा कार्यालयात आयोजित कार्यकारणीच्या बैठकीत मोरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सरचिटणीस सुशिल मेंगडे, राहुल लोणीकर, तसेच प्रदेशातील भारतीय जनता युवा मोर्च्याचे सचिव, सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भाजयुमोचे उपाध्यक्ष अनुप मोरे यांनी राज्यभर दौरे करून पक्षाची विचारधारा सामाजाच्या शेवटच्या थरापर्यंत पोचविण्याचे कार्य केले. पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यात भाजपच्या बालेकिल्ल्यात त्यांनी युवकांची मोठ बांधली. त्यांना मुख्य प्रवाहात आणून पक्षाची ध्येयधोरणे आखून कामाचे आदेश दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत असताना दिसत आहे.
नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे कायम पाठपुरावा केला. पाणी पुरवठा, कचरा समस्या, रस्ते सफाई, आरोग्य, वैद्यकीय, शैक्षणिक आदी प्रश्नांसाठी त्यांनी संबंधित अधिका-यांना निर्णय घेण्यास भाग पाडले. विद्युत समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांनी निगडी प्राधिकरणातील विद्युत विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला ताळ्यावर आणले. निगडी उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडले.
सामाजिक क्षेत्रात त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून सर्व घटकातील नागरिकांना एकत्र आणून एकात्मतेचे दर्शन घडविले. ताजे उदाहरण द्यायचेच झाले तर निगडी प्राधिकरणातील सिटी प्राईड शाळेच्या मैदानावर मकर संक्रांतीनिमित्त भव्य महोत्सव भरविला आहे. त्यामध्ये हातमाग व हस्तकलेच्या आकर्षक वस्तू खरेदीसाठी ठेवल्या आहेत. खाऊ गल्लीमध्ये सर्वांनाच चमचमीत, चविष्ठ पदार्थाचा आस्वाद घ्यायला मिळत आहे. लहान मुलांसाठी मामाचं गाव व गावातील मज्जा उभोगण्यास मिळत आहे. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि तळागाळातील लोकांप्रती स्नेह जपण्याचे काम अनुप मोरे यांनी केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांची युवा वॉरीयर्सच्या महाराष्ट्र राज्य संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


















