- १८ फेब्रुवारीपर्यंतच स्वीकारणार अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२१) :- महापालिका आस्थापनेवरील बदलीसाठी पात्र ठरणाऱ्या गट ‘ अ ते’ ड ‘ मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी पाठवावी. तसेच ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैयक्तीक, वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असेल, असे अर्जही विभागप्रमुखांनी १८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रशासन विभागाकडे पाठवावेत, असे आदेश प्रशासन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी दिले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण २०११ मध्ये तयार केले आहे. कर्मचाऱ्यांच्या शासनाच्या मार्गदर्शनानुसार बदल्या करण्यात आल्या नाहीत. ज्या अधिकारी, कर्मचा-यांनी २३ जानेवारी २०२० मध्ये बदलीसाठी अर्ज केले असतील त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यांना बदलीसाठी पुन्हा मुदतीत अर्ज करावे लागणार आहेत.
एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण बदलीस पात्र ठरतात. या धोरणानुसार बदलीस पात्र ठरणारे तसेच वैयक्तिक आणि वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी पाठवावी. १८ फेब्रुवारीपर्यंत विभागप्रमुखांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रशासनाकडे यादी पाठवावी. मुदतीनंतर आलेले अर्ज प्रशासन विभागामध्ये स्वीकारले जाणार नाहीत.












